मारिया महा.मुल आणि जै.जव्हेरी पॉलि.महा.यांच्या संयुक्त विद्यमाने गृह अर्थ.वि.च्या वतीने गॅस सिलेंडर सुरक्षा कार्यक्रम संपन्न.

मारिया महा.मुल आणि जै.जव्हेरी पॉलि.महा.यांच्या संयुक्त विद्यमाने गृह अर्थ.वि.च्या वतीने गॅस सिलेंडर सुरक्षा कार्यक्रम संपन्न.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : दिनांक 24 ऑगस्ट 2024 ला मारिया महाविद्यालय मुल आणि जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्निक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने गॅस सिलेंडर सुरक्षा हा कार्यक्रम घेण्यात आला.


 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे, प्रमुख अतिथी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सोनपीपरे, या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक सूर्या कंपनीचे माननीय भालेराव सर.आणि माननीय गवई सर लाभले होते. माननीय भालेराव सर यांनी स्वयंपाक घरातील गॅस तथा गिझर गॅस सुरक्षा उपक्रमाबद्दल माहिती देताना संभाव्य धोके कसे टाळता येतील त्याबद्दल काय खबरदारी घ्यायला पाहिजे.


तसेच गॅस सिलेंडर व्यवस्थित आहे किंवा नाही त्याबद्दलची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकाच्या रूपाने समस्त कर्मचारीवृंद आणि विद्यार्थ्यांना दिली. विशेष सहकार्य माननीय बलवंतजी करकाडे मुख्य लिपिक यांनी घडवून आणला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रफुल निरुडवर यांनी तर आभार गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कविता शेंडे यांनी मानले या कार्यक्रमाला मारिया महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय समस्त कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !