डॉ.रंगनाथनची ग्रंथालय पंचसूत्री जगाला देण. - प्राचार्य, डॉ.डी.एच.गहाणे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०८/२४ " भारतातील आर्यभट्ट यांनी जगाला शून्याची ओळख करुन दिली तर ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांनी ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाची व्यवथा म्हणून ग्रंथालय पंचसूत्री दिली.यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीचा ग्रंथ ग्रंथालयात असला पाहिजे व प्रत्येक ग्रंथाला वाचक भेटला पाहिजे.
हे विद्यार्थ्यांसाठी अतीमहत्वाचे असून ग्रंथालयात जाऊन वाचनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर झाले.सुसज्ज ग्रंथालय ही ज्ञानाची पाणपोई असून डॉ.रंगनाथनची पंचसूत्री ही भारताने जगाला दिलेली मोठी देण होय " असे बहूमूल्य विवेचन प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती निमित्त मार्गदर्शक म्हणून बोलत होते
विचारपिठावर उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्राम,सुषमा राऊत प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते.यावेळी डॉ रंगनाथनच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन सर्वांनी अभिवादन केले.
प्रास्ताविक ग्रंथालय समितीध्यक्ष डॉ युवराज मेश्राम तर संचालन व आभार दत्तू भागडकरांनी केले. कार्यक्रमाला डॉ.कुलजित शर्मा,डॉ रतन मेश्राम,डॉ.अतुल येरपुडे,प्रा.दलेश परशुरामकर, डॉ प्रकाश वट्टी,डॉ अजित खाजगीवाले,प्रा जयेश हजारे, प्रा धिरज आतला,वैभव बोकडे,जितू,राजू मेश्राम,विलास खोब्रागडे व विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते