गर्भवती महिला विष पिऊन केली आत्महत्या.
एस.के.24 तास
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे वास्तव्यास असलेल्या एका गर्भवती महिलेने पती च्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
नीलिमा धर्मेंद्र पराते वय,21 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.
मृतक महिलेचे नवरगाव येथील धर्मेंद्र पराते वय,37 वर्ष याचेशी लग्न झाले होते.पती धर्मेंद्र हा क्षुल्लक कारणा वररून निलीमाचा छळ करून मानसिक त्रास देत असल्यानेच आपल्या मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार पोलीसात मृतकाच्या आईने दाखल केली आहे.
यावरून पोलिसात पती धर्मेंद्र यांचेवर भारतीय न्याय सहिता अन्वये कलम ८५,१०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक,विजय राठोड यांच्या नेतृत्वात सिंदेवाही पोलिस करीत आहे.