पोर्ला येथे दारूचा महापूर ; पोटेश्वर मार्ग अवैध दारूची तस्करी जोरात सुरु.

पोर्ला येथे दारूचा महापूर ; पोटेश्वर मार्ग अवैध दारूची तस्करी जोरात सुरु. 


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील लोकवस्तीने मोठे गाव असलेला अवध्या १५ कि.मी अंतरावरील पोर्ला गावात पोळा सन येण्यापूर्वीच दारुचा महापूर सुरु असुन वैनगंगा नदी ओलांडून पोटेश्वर घाटावरून अहो रात्र अवैध दारूची तस्करी सुरु असते. 


ती दारू पोटेश्वर रोड मार्गाने पोर्ला व मोहसरी दारू विक्रेते राजरोसपणे आणून जोरात विक्री सुरु आहे. तिन महिन्यांपूर्वी तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी पोलीस पाटिल बारसागडे व अन्य गावकऱ्यांनी गाडीने पोत्यात भरून आणत असलेली दारू पकडली व गडचिरोली पोलीसांच्या स्वाधिन केले होते. 


आता मात्र पोर्ला बिट जमादार सदर गावाकडे फिरकुनही पाहत नाही असे गावकऱ्याचे म्हणणे आहे.त्यामुळे पोर्ला व मोहसरी गावातील दारू विक्रेत्याचे चांगलेच फावले आहे.पोर्ला गावात तळ्याच्या पाळीवर ग्रामीण रुग्णालय जवळपास,टोलीवर,देलोडा रस्ता टि.पांईडवर व विसावा जवळ शाळेजवळ,दारूविक्रेते राजरोसपणे दारूची विक्री करतांना दिसतात. 


ते गावठी व देशी दारूची विक्री करतांत काही शाळेकरी मुले सुद्धा दारूच्या व्यवनाधिन होत आहेत. तर काही दारुडे दारू पिऊन झगडा भांडण करतांना दिसतात.दारू पिणाऱ्या च्या घरच्या महिला त्रस्त झाल्या आहेत.यावर पायबंद घालण्याची गरज आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !