स्वातंत्र्यदिनी श्री.गजानन अलोने यांच्या हस्ते जे.एस.एस.गडचिरोली चे ध्वजारोहण संपन्न.

स्वातंत्र्यदिनी श्री.गजानन अलोने यांच्या हस्ते जे.एस.एस.गडचिरोली चे ध्वजारोहण संपन्न.


सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!


गडचिरोली : १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्यदिनी  गजानन अलोन यांच्या शुभ हस्ते जे.एस.एस गडचिरोली चा ध्वजारोहण कार्यक्रम गडचिरोली या ठिकाणी संपन्न झाला.

श्री.चव्हाण सर यांनी भारत स्वातंत्र पूर्व काळात कश्या पद्धतीने रणनीति तयार केली, राष्ट्रपिता महात्मा गाँधी यांचा मिटाचा सत्याग्रह,चलेजाव चळवळ, असहकार चळवळ,डॉ.बाबासाहेब यांचे विचार,संविधानतील तरतूदी इत्यादि बाबत माहिती दिली.

स्वातंत्र्यासाठीचा त्याग व बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्य वीरांचा समाजाला विसरपडू नये या दृष्टिकोनातून जे.एस.एस.गडचिरोली च्या माध्यमातून हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच राष्ट्र भावने बाबत जागरूक राहावे असे मा.श्रीराम पांचखेड़े साहेब जिल्हा नियोजन अधिकारी, गडचिरोली यांच्या माध्यमातून करण्यात आले.तर कार्यक्रम अधिकारी श्री.केशव चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.


सदर ध्वजारोहण कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी  प्रमुख अतिथि श्रीराम पांचखेड़े साहेब,गजानन अलोने, संचालक,श्री.केशव चव्हाण जन शिक्षण संस्थान गडचिरोली चे कार्यक्रम अधिकारी,श्री जय शिवहरे (लेखपाल ), श्रीमती,मातेरे,काजल चाँदेकर, आशीष टेकाम, नितेश चौधरी,तुषार शेडमेक हे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !