धान्य आहेत परंतु इंटरनेट सेवा नाही.शासनाने ऑफलाईन सेवा सुरु करावी. मागणी व मोर्चा.
मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे शासनाने ग्राहकांना वाटप करण्याकरीता धान्य उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु इंटेरनेट सेवाच नाही. तेव्हा धान्य वाटप कसे करावे. ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याची परवानगी शासनाने घ्यावी जेणेकरून धान्य वाटप करणे सोयीचे होईल यासाठी गडचिरोली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचा मोर्चा इंदिरा गांधी चौकापासून ते तहसिल कार्यालय गडचिरोली पर्यंत येवून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
माहागाईत कंट्रोल दुकानदारांस रुपये 300 प्रती क्विंटल मानधान देण्यात यावे.अनेक कामात आंगठा (thumb ) एकदाच घेण्यात यावे जेणेकरून ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार नाही.
केवायसी करण्यासाठी आम्ही शासनाला सर्वश्री सहकार्य करतो परंतु बाहेरून केवायसी साठी ग्राहक १५० रुपये देतो. स्वस्त धान्य दुकानदास किमान ५० रुपये ग्राहकांनी घ्यावे अशी कंट्रोल दुकानदारांची मागणी आहे. आदि मागण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी इंदिरा गांधी चौकापासून ते तहसिल कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला व मागण्याचे निवेदन तहसिलदार गडचिरोली यांना देण्यात आले.
सदर मोर्च्यात सुरेश बाबांळे , संजय आलोणे , पि.पी. बाबोंळे ,सरिता ढेभुर्ण , बि यु नैताम , टि. आर. अंबादे, राजेंद्र कुकुडकर , एम बी जुमनाके , डि.एच पानसे , वि.टी निलेकार , आर. बी. रामटेके , रंजना थोरात , बोरकर मॅडम ' जे.के बांबोळे , सहीत गडचिरोली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.