आदिवासी आपली परंपरा आजही जोपासत आहेत यात शिक्षणाची भर घाला तुमचा विकास नक्कीच आहे. - माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेडी
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - गावं ग्रामसभा आदिवासी गोटूलच्या भव्य आवारात पोटेगांव यांच्या वतिने , जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा थाटात संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी केशव कड्यामि तर उदघाटन योगराज कड्यामी तसेच प्रमुख पाहूने म्हणुन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेडी , आदिवासीचे नेते प्रकाशजी गेडाम, कालिदास कड्यामि . सामाजीक कार्यकर्ते शिवाजी नरोटे , आदिवासी नेते नितिन पदा , सरपंच मनोहर पोटावी , बामसेफ चे भोजराज कानेकर , रिपब्लिकन पार्टी चे प्रा. मुनिश्वर बोरकर , गोपाल रायपूरे , डॉ. कुमरे मॅडम , प्रभारी,सरपंच अर्चना सुरपाम,सनकु पोटावी सर ,रमेश कोराम . सौ . प्रेमिला नरोटे सौ कल्पना नरोटे . आधी मान्यवर उपस्थित होते . प्रथम क्रान्तीविर माहामानवांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन व पूजन करण्यात आले.
नंतर ध्वजारोहण करण्यात आले मनोहर पोटावी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिवस 21 व्या शतकात तंत्रज्ञान संगणकाच्या युगात जगातील वेगवेगळ्या देशामधिल आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगत आहे.गरिबी.सज्ञान.आरोग्य.सुविधांचा अशा अनेक समस्यांना तोंड देत आहे.वर्तमानातून उज्वल भविष्याकडे हा आदिवासी बाधंव समाज आज जात आहे . हे नक्की आशावादी चित्र आहे.
याप्रसंगी नितिन पदा म्हणाले की , आदिवासी बांधव अज्ञानी अडाणी आहे. त्यामुळे आमच्या मताचा गैरफायदा घेण्याचे काम प्रस्तापिताकडून होत आहे. हे कुठेतरी थाबविण्याची गरज आहे.
याप्रसंगी भोजराज कानेकर म्हणाले की आजचा दिवश हा फक्त जागतिकआदिवासी दिवश नसुन तो जागतिक मुलनिवासी दिवश म्हणुन पाळणे गरजेचे आहे. या प्रसंगी शिवाजी नरोटे,प्रा.मुनिश्वर बोरकर,गोपाल रायपूरे,प्रकाश गेडाम यांनीही आपले विचार मांडले तर माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की आदिवासी बांधव आंबा खायचा असेल तर गुंडीपाडवा नंतरच,पोलो केल्याशिवाय पेरणी , रोवणा सुरु करत नाही.हि संस्कृती आदिवासीं बांधवानी आजही जपली आहे.
जल जंगल , जमीन हि आदिवासी बांधवांमधे आजही जपल्या जात आहे त्यामुळे पर्यावरण आबादित आहे. तरीही आदिवासी बांधवाचा फायदा आमच्या जमातीत घुसलेले लोक घेत आहेत.म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिलेला मुलमंत्र शिका ' संघटित व्हा व संघर्ष करा यांतच आदिवासींची प्रगती आहे.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मुजुमकर तर कालिदास कड्यामि यांनी आभार व्यक्त केले . कार्यक्रमास पोटेगांव सर्कलचे १४ गावचे आदिवासी बांधव मोठ्या संखेनी उपस्थित होते.