बहुजन समाज पार्टी,गडचिरोली तर्फे बिहार व कोलकत्ता येथील ट्रेनि महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
एस.के.24 तास
गडचिरोली : बहुजन समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात बिहार मुजफ्फरनगरला दलित मासुम मुलगी व पं.बंगाल मधील कोलकत्ता येथील ट्रेनि महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली.
बहुजन समाज पार्टी गडचिरोली येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौक येथे भारतातील बिहार राज्यातील मुजफ्फरनगर येथील रुपा कुमारी 14 वर्षीय दलित मासुम मुलीला रात्रो घरातुन उचलून नेवुन सामुहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता मधील ट्रेनी महिला डॉक्टर वय,31 वर्षे ही रात्रो कर्तव्यावर असताना आरोपींनी सामुहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केली.
ही देशाला काळीमा फासणारी घटना असुन या दोन्ही घटनेचा बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने इंदिरा गांधी चौकात जाहीर धिक्कार करून जाहीर निषेध केला.या घटनेतील दोन्ही आरोपींना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला निवेदनाद्वारे दिला.
यावेळी मा भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली,मंदीप एम गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, मा. गुलाबराव मडावी, मा. सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली, नरेश महाडोळे, पुरुषोत्तमा रामटेके,प्रेमदास रामटेके, लवकुश भैसारे,ज्ञानेश्वर वाडके, सुमन क-हाडे, वेणुताई खोब्रागडे शहर अध्यक्ष बसपा गडचिरोली, आरती कोल्हे, विद्या दुग्गा, मालता पुडो, वनिता पदा, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.