बांधकाम कामगारांना विस हजार २०,००० रुपये दिवाळी बोनस जाहीर करा.
★ शिवराज्य आयटीआय विद्यार्थी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, अविनाश वाळके यांची निवेदनाद्वारे मागणी.
राहुल सोमनकार !! तालुका प्रतिनिधी,पोंभूर्णा !!
पोंभुर्णा : महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने महाराष्ट्रातील सर्व नोंदित बांधकाम कामगारांना विस हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करावा अशी मागणी शिवराज्य आय.टी.आय. विद्यार्थी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,अविनाश वाळके यांनी मंडळाचे अध्यक्ष,तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगार हे एका मालकांकडे कायमस्वरूपी काम करत नाही इतर सर्व उद्योगातील कामगारांना दिवाळीत बोनस मिळतो मात्र बांधकाम कामगारांना बोनस मिळत नाही.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे हजारो कोटी चा निधी उपलब्ध आहे त्यामुळे बांधकाम कामगारांना विस हजार रुपये (२०,०००)बोनस जाहीर करावा अशी मागणी शिवराज्य आयटीआय विद्यार्थी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष,अविनाश वाळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदन तहसीलदार पोंभुर्णा यांच्या माध्यमातून देण्यात आले निवेदन देताना बांधकाम कामगार अतुल कोपावार, सामाजिक कार्यकर्ते सुगत गेडाम, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज वडेट्टीवार,अविश्रांत अलगमवार, एकनाथ बुरांडे, सुनिल कुंदोजवार,अजय उराडे,प्रशांत फुलझेले,व असंख्य संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.