" इन्स्पायर " करीअर अकॅडमी ची दिपाली राज्यात मुलींमधून चौदावी आली ; निश्चीत ध्येय अन् अभ्यासात सातत्य राखत ती " पी एस आय " झाली. ★ इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रम्हपुरी येथे यशस्वीताचा सत्कार समारंभ संपन्न.

" इन्स्पायर " करीअर अकॅडमी ची दिपाली राज्यात मुलींमधून चौदावी आली ; निश्चीत ध्येय अन् अभ्यासात सातत्य राखत ती " पी एस आय " झाली.


इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रम्हपुरी येथे यशस्वीताचा सत्कार समारंभ संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : इन्स्पायर करिअर अकॅडमी ची नियमित विद्यार्थिनी कु.दिपाली काकाजी मिसार हिने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. शेतकरी कुटुंबातील दिपाली घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यासोबतच ग्रामीण भागात येणाऱ्या अनेक खडतर परिस्थितीवर, मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिपालीने राज्यातून मुलींमधून चौदावी येणाचा मान मिळवला आहे. त्यामुळे तीचे सर्वत्र कौतुक होत असुन इन्स्पायर करिअर अकॅडमीने  सत्कार समारंभ आयोजित करुन दिपाली सोबतच अकॅडमीतील यशस्विताचा सत्कार करुन त्याच्या यशाचा गौरव केला आहे.

दीपालीने आपल्या यशाचे श्रेय आई, वडिलांना व इन्स्पायर करिअर अकॅडमी' च्या मार्गदर्शकांना दिले आहे. "निश्चित ध्येय, अभ्यासातील सातत्य तद्वतच इन्स्पायर करिअर अकॅडमी च्या मार्गदर्शकाकडुन वेळोवेळी मीळनारे मार्गदर्शन, एकनिष्ठता, सोबतच मार्गदर्शकावर असलेली निस्सीम श्रध्दा" हेच माझ्या यशाचे मुख्य गमक असल्याचे दिपालीने सत्कार स्वीकारतांना सांगितले.


" ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील होतकरु, हुशार विद्यार्थाना हलाखीची परीस्थिती आड येत असल्याने  नागपुर, पुणे, सारख्या ठिकाणी जाऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेऊ शकत नाही अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल आवश्यक ते मार्गदर्शन देण्याचे गुणवत्तापूर्ण कार्य इन्स्पायर करिअर अकॅडमीने केले असून, अनवरत करत राहणार आहे. ग्रामीण परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना विविध शासकीय पदावर रुजू होण्यासाठी या अकॅडमी ने महत्तम व मौलिक कार्य करीत बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे" असे गौरवोद्गार अकॅडमीच्या संचालिका सौ. एकता गुप्ता मॅडम यांनी  दीपाली चा सत्कार करताना केले.


आपल्या यशाची शृंखला जोपासत पोलीस भरतीमध्ये कु.प्रीती पिल्लारे (बुलढाणा पोलीस) हिने यश मिळवत बुलढाणा जिल्ह्यातून मुलींमध्ये दुसरी येणाचा मान मिळवला आहे तसेच तुषार कापगते यांची SRPF मध्ये निवड झाली. याचाही इन्स्पायर अकॅडमीच्या वतीने विषेश सत्कार करुन गौरव करण्यात आला. 


आयोजीत सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून  इन्स्पायर अकॅडमी च्या संचालिका सौ.एकता गुप्ता मॅडम,जि.प. चंद्रपूर चे माजी उपसभापती  क्रीष्णा  सहारे, चंद्रेश गुप्ता ,नरेश रामटेके, देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी गोवर्धन दोनाडकर, ब्रम्हपुरी दर्पण चे संपादक श्री राहुलजी भोयर ,ब्रम्हपुरी समाचार चे महेश पिलारे   सकाळ चे तालुका प्रतिनिधी राहुल मैंद, प्रीतम जनबंधू ,  महाले सर,इन्स्पायर करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक प्रा. विवेक खरवडे सर, देवानंद ठाकरे सर, प्रा. प्रवीण प्रधान सर ,प्रणय पिठाले, वर्षा मॅडम तसेच कु.शीतल भाजीपाले मॅडम उपस्थित होत्या.

      

सदर सत्कार सोहळ्याचे संचालन,विवेक खरवडे सर यांनी केले. तर आभार  शीतल भाजिपाले यांनी मानले. यशस्विताचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी इन्स्पायर करिअर अकॅडमीचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !