गडचिरोली जिल्ह्यातील समस्या बाबत मा.नितीन राऊत यांच्याशी चर्चा.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : कुसुम ताई अलाम आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त तथा प्रदेश उपाध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग कांग्रेस यांनी मा नितीन राऊत माजी मंत्री यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांचा पाढा वाचला.गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्ती नैसर्गिक साधनसंपत्तीची सर्रास लूट होत असुन आदिवासींच्या हक्कांना येथे डावलले जात आहे.
कोणी याविषयी बोलले त्यांना विरोध केला जातो.स्थानिक आदिवासी नियोजनबध्द आंदोलन करतात पण त्यांना हुसकावून लावले गेले.येथील आदिवासी महिलांचे शोषण आता सामान्य बाब झाली असुन हे दुर्दैव आहे,आरोग्य सुरक्षा प्रश्नांकित आहे.लहान लहान मुलींवरील वाढते बलात्कार, खनिज वाहतूकीमुळे रस्त्यालगतच्या शेतीची नासधूस झाली.
आणि त्याची कोणतीही भरपाई न मिळाल्याने आदिवासी उरांव शेतकऱ्यांने केलेली आत्महत्या व अनेक आत्महत्या,रस्त्यावरील अपघातांची मालिका, दारूचे वाढते प्रमाण, शिक्षण रोजगार 250 दिवस शांततेत सुरू असलेल्या सुरजागड आंदोलनाला उधळले जाताना बोलक्या आंदोलनकारी महिलांबाबतीत प्रशासनाची संशयात्मक भूमिका अशा विविध विषयांवर त्यांनी माजी मंत्री मा.नितीन राऊत यांच्या सोबत प्रदीर्घ चर्चा केली.
यावेळी अभ्यास व चिंतन करून तयार केलेले आदिवासी घोषणा पत्र व आदिवासी महिला अजेंडा दिला.पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन गडचिरोली ची स्मरणिका तसेच रान जखमांचे गोंदण कविता संग्रह भेट दिला.एड प्रियंका बांबोळे, सामाजिक कार्यकर्ता सावी फाऊंडेशन प्रियंका बागडे यांनी सुध्दा गडचिरोली येथील परिस्थितीचे विदारक सत्य सांगितले.