मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने एक दिवसीय शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन (Nestle healthy kids)'खेळाद्वारे विकास' कार्यक्रम चामोर्शी तालुक्यातील ४५ गावात ३४ शाळेत मुलांच्या विकासासाठी काम करते. मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे व जिल्हा प्रशिक्षक संदिप राऊत यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात शिक्षक सहकारी पतसंस्था चामोर्शी येथे शाळा व्यवस्थापन समिती एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचा उद्देश शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करणे,त्यांच्या जबाबदाऱ्या पटवून देणे,लागू करणारे प्लान तयार करून आपल्या शाळेच्या विकासास मदत करणे अश्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत ४० गावातील एकूण ७० सदस्यांनी सहभाग दर्शविला आणि उत्साहात कार्यशाळा यशस्वी केली.
या कार्यशाळेत सर्व कृतियूक्त मार्गदर्शन करण्यात आले,मुख्य प्रशिक्षक म्हणून संदिप राऊत,दिनेश कामतवार व योगिता सातपुते यांनी मार्गदर्शन केले. व युवा मार्गदर्शक प्रफुल निरुडवार,रोशन तीवाडे,पंकज शंभरकर,अश्विनी उराडे,राजेश्वर माडेमवार,सोनाली रणदिवे,पल्लवी झरकर,किशोर किनेकर यांनी अथक परिश्रम घेतले.