उत्तम लेखक,कवी व विचारवंत घडविण्याचे व्यासपीठ म्हणजे माणिक वार्षिकांक. - नेवजाबाई हितकारणी संस्थेचे सचिव,श्री.अशोक भैया
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,२४/०८/२४ महाविद्यालयीन वार्षिकांक 'माणिक' म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशील प्रतिभेचा आविष्कार होय. यामुळे विद्यार्थ्यांमधून चांगले लेखक, कवी व विचारवंत घडतील,विद्यार्थ्यांनी उत्तम लेखन,कौशल्य आत्मसात करावे. उत्तम लेखक,कवी व विचारवंत घडविण्याचे व्यासपीठ म्हणजे माणिक वार्षिकांक आहे, असे विचार नेवजाबाई हितकारणी संस्थेचे सचिव,श्री.अशोक भैया यांनी व्यक्त केले.ते स्थानिक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या वार्षिकांक 'माणिक ' २०२३-२४ च्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ने. हि. महाविद्यालये प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे होते. नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. अशोकजी भैया,डॉ. सुभाष शेकोकार, मेजर विनोद नरड,प्रा.आनंद भोयर,सौ.संगीता ठाकरे,डॉ. किशोर नकतोडे,माणिकचे मुख्य संपादक डॉ. मोहन कापगते हे उपस्थित होते. मान्यवरांनी या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून दर्जेदार व वाचनीय अंक प्रकाशित केल्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे यांनी माणिक वर्षिकांकाचे वैशिष्ट्य उलगडून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.मोहन कापगते यांनी केले. तर आभार डॉ.पद्माकर वानखडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सुनील चौधरी,प्रा.अभिमन्यू पवार, प्रा. कृतीका बोरकर,प्रा.शिरीन खान, प्रा.सुशील बोरकर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.