चामोर्शी रोड सेमाना टर्निंग वर मार्निग वाकींगला जाणाऱ्या बाळू टेभुर्णे,वसंत मेश्राम,राजु उंदिरवाडे अपघातात जखमी.
★ अज्ञान वाहन चालक गाडी घेऊन फरार.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : गोकुळनगर चामोर्शी रोड सेमाना पायदळ व सायकलने वॉकीगं करणारे अनेक व्यक्ती सेमाना रोड जातात अश्यातच तिन इसमाना चार चाकी वाहनाने सेमाना टर्निग पांईडवर धडक देऊन पसार झाल्यामुळे तिन व्यक्ती जखमी झाले.
आज दि.8 ऑगष्टला सकाळी 5 चे दरम्यान वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष,बाळू टेभुर्णे,गोकुळनगर राजु उंदिरवाडे सरपंच (गोगांव )गोकुळनगर व वसंत मेश्राम गोकुळनगर हे नेहमीप्रमाणे सकाळी सायकलने सेमाना रोड फिरायला गेले.
असता सेमाना टर्निंग पॉइंडवर मागुन फोर व्हिलर गाडीने धडक देऊन निघुन गेली यात वरील तिन्ही व्यक्ती किरकोड जखमी झाले असुन त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.असुन फोरव्हिलर वाल्यांची नेम प्लेट रस्त्याच्या कडेला पडली असुन गाडी नंबर MH.33.V.0090 असा आहे.
तर फिरणाऱ्या अपघात व्यक्तीच्या सायकलीं सुद्धा रस्त्यावर पडल्या आहेत. गडचिरोली पोलिसांनी अज्ञान वाहनांचा शोध घ्यावा अशी मागणी मार्निग वॉक वाल्याकडून होत आहे.