जि.प.शाळा बेलगाव ने काढली तिरंगा रॅली.

जि.प.शाळा बेलगाव ने काढली  तिरंगा रॅली.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक                                                       

ब्रम्हपुरी : दिनांक, ११/०८/२४ केन्द्र व राज्य शासनाद्वारे जाहीर केलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, युवक, युवती , नागरिक, बचत गट महिला यांच्या सहभागात शनिवारी ला  सकाळी बेलगांव जाणी येथे " हर घर तिरंगा " रॅली काढण्यात आली.सहभागी विद्यार्थ्याच्या हातात राष्ट्रध्वज होते. सदर रॅलीतून राष्ट्र व देशभक्ती बाबत जनजागृती करण्यात आली. गावातील प्रमुख भागातून मार्गक्रमण करत शाळेत रॅलीचा समारोप झाला.


९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा मोहिम राज्य शासनाद्वारे राबविली जात आहे. या मोहिमेचा भाग म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्याने 'हर घर तिरंगा' सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  शाळेचे मुख्याध्यापक वैकुंठ टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनात सचिन परशुरामकर यांच्या सहकार्याने लिंकेश्वर अवसरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मनोज अवसरे, सुदिन बोरकर, दादाजी अवसरे, संपत धोटे, इब्राहिम, राजेश्वर धोटे, प्रमोद बोरकर आदींच्या उपस्थितीत रॅली संपन्न झाली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !