काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने दिली भेट ; आणि प्रशासनाला दिला इशारा.


काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने दिली भेट ; आणि प्रशासनाला दिला इशारा.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक


मुल : काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने दिली भेट आणि प्रशासनाला  इशारा दिला.अनर्थ टाळायचा असेल तर त्वरित कारवाई करा मामा तलावांच्या देखरेखीचे काम योग्य प्रकारे न केल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक गावचे तलाव उदाहरणार्थ चिचपल्ली दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतीचे आणि लोकांच्या वस्तीचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच आठवण येथील तलावाच्या पाळीला सुद्धा मोठे भगदाड पडलेले आहे.


तो तलाव जर फुटला तर शेतीच्या आणि वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी असा इशारा भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने प्रशासनाला दिलेला आहे.


या घटनेमुळे मामा तलावांच्या देखरेखितेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे मुसळधार पाऊस आला पूर आला की मामा तलावांच्या पाणी फुटतात आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना भोगावा लागतो हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ही भूमिपुत्र बिघडणे यावेळी केली आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !