चिमुर क्षेत्रातील सहा ही विधानसभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार. ★ आर.पि.आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर.

चिमुर क्षेत्रातील सहा ही विधानसभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार.


आर.पि.आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : रिपब्लिकन पार्टी च्या विविध गटाची बैठक रिपब्लिकन पार्टी खोरीपाचे कार्यालय ब्रम्हपुरी येथे दि.10 ऑगस्ट 2024 शनिवार ला पार पडली.कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणुन खोरीपाचे नेते डॉक्टर प्राचार्य,देवेश कांबळे तर प्रमुख उपस्थितीत रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर, खोरीपाचे केंद्रिय सरचिटणीस,जिवन बागडे,रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष,गोपाल रायपूरे,खोरीपाचे शहर अध्यक्ष,प्रशांत डांगे,पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर,उपाध्यक्ष मारोती भैसारे,प्रा.नरेश रामटेके, रिपाईचे,विजय रामटेके,खोरीपाचे तालुकाध्यक्ष रामटेके,धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते,सुरेश कन्नमवार उपस्थित होते.

बिजेपी आणि कांग्रेस एकच माळेचे मनी असुन लोकसभा निवडणुकीत दगडापेक्षा विट बरी म्हणुन कांग्रेस ला सहकार्य केले.आता आम्हाला विटही फुटली सारखी वाटतो.कांग्रेसला मतदान करायचे आणि कांग्रेस चे उमेदवार निवडून आल्यावर " काम झाला - वैद्य मेला " प्रमाणे रिपाई च्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार कांग्रेस वाल्याकडून होतांना दिसतो. 

व्याहाड (खुर्द) - गांगलवाडी रस्तावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.एकंदरीत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा विकास झालेला नाही. 


कांग्रेस कडून केवळ लालीपाप देण्याचे काम सुरु आहे.संविधान कुणीही बदलवू शकत नाही. संविधान रिपाईच्या विविध गटाचे नेतेच वाचवू शकतात.त्यामुळे आता बिजेपी - कांग्रेस च्या नादाला न लागता रिपब्लिकन पार्टी तील विविध गटाच्या स्थानिक नेत्यांना एकत्र करून चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात तिसरी आघाडी करण्याचा चंग रिपाई नेत्यांनी बांधला असुन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कुनबी लॉबी व एस. सी.लॉबी एकत्र येईल काय ? याची चाचपणी सुद्धा सुरू असुन कुनबी समाजाचे धडाडीचे नेते विनोद झोडगे पाटिल यांच्या सोबतही चर्चा करण्यात आली. 


तिसऱ्या आघाडीत गोगंपा, बि.आर.एस.पी, mim,खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद पार्टी आदि स्थानिक नेत्यांना पुढच्या बैठकीत पाचारण करण्याचे डॉ.देवेश कांबळे,प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले.बैठकीत साधक - बाधक चर्चा होवून बैठकीला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !