दै.महासागर चे पत्रकार प्रशांत डांगे यांचा मंत्री मुनगंटीवार यांचे हस्ते सत्कार.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
चंद्रपूर -चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पत्रकारिता पुरस्कार प्रशांत डांगे दैनिक महासागर तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी यांना जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार तसेच
दैनिक हितवाद चे वरिष्ठ उपसंपादक कार्तिक लोखंडे नागपूर यांच्याहस्ते पुरस्कार शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व धनादेशाचे चेक प्रदान करण्यात आले. प्रा. प्रशांत डांगे हे ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून ते पत्रकारिता सामाजीक , राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात सदैव कार्यरत असून ते रिपब्लिकन पार्टी खोरीपाचे ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष असुन ते गोरगरीबांच्या साठी अहोरात्र झटत असतात.
श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर तर्फे त्यांना दिल्या गेलेल्या पुरस्कार व केलेल्या सत्कारा बद्दल डॉ. प्राचार्य देवेश कांबळे , प्रा. मुनिश्वर बोरकर , विनोद झोडगे , गोपाल रायपुरे , जिवन बागडे , विजय रामटेके , नरेश रामटेकेआदिंनी अभिनंदन केलेले आहे.