जि.प.प्राथमिक जामसाळा (जुना) शाळेला संगणक संच भेट ; विरोधी पक्षनते,विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार
एस.के.24 तास
सिंदेवाही : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामसाळा (जुना ) येथील विद्यार्थी दरवर्षी नवोदय परीक्षेत प्राविण्य मिळवितात. त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने इतर परीक्षांची माहिती तसेच नवोदय परीक्षेतील महत्वपूर्ण बाबी जाणून घेण्याकरिता असणारे मार्गदर्शन सराव पेपर सहज उपलब्ध व्हावे या उदांत हेतूने राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून येथील शाळेला संगणक संच भेट देऊ विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक आयुष्याचा मार्ग सुकर करून दिला.
आज स्पर्धेचे युग आहे. शहरी विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा घरपोच मिळू लागल्या. कारण संगणकीय युगात आता मिनी संगणक म्हणून अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधा तसेच त्यांच्या घरची आर्थिक हालाखीची परिस्थिती यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
अशातच सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा जुना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अतिशय अभ्यासू असून दरवर्षी या शाळेतून विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत प्रावीण्य प्राप्तीनंतर निवड होते. सदर परीक्षा व इतर अनेक स्पर्धा परीक्षा याचे ज्ञान व सराव विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने येथील शिक्षक वृद्धांनी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे कडे संगणक संच उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
जामसाळा येथील ग्रामस्थ व शिक्षकांची मागणी लक्षात घेत राज्याची विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी कुठलाही विलंब न करता सदर शाळेला संगणक संच भेट दिले. आज प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार या तालुका दौऱ्यावर असताना जामशाळा (जुना) येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन सदर संगणक संच शालेय शिक्षक वृंदांकडे सुपूर्द केला. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमातून नोटबुक यांचे वितरणही करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे ज्येष्ठ वामनराव सावसागडे,
तालुका काँग्रेस अध्यक्ष,रमाकांत लोंधे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दादाजी चौके, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, महीला आघाडी तालुकाध्यक्ष सीमा सहारे,शहराध्यक्ष प्रीती सागरे, कृउबा संचालक जयश्री कावळे,पुष्पा सिडाम, युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजीत मुपीडवार, जानकीराम वाघमारे, सरपंच रूपाली रत्नावार ,निमंत्रिका कोकोडे, माजी प . स.सदस्य प्रीती गुरनुले,रजनी काऊलकर,मंगेश मेश्राम गुणवंत अल्मस्त, तथा जामसाळा येथील नागरिक व महिला भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.