मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज संकेतस्थळावर भरावे. - मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज संकेतस्थळावर भरावे. - मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह


एस.के.24 तास


गडचिरोली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup  हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले असून लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.  


या योजनेसाठी 31 जुलैअखेरपर्यंत 1 लाख 52 हजार 327 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 37 हजार 564 अर्ज मंजूर झाले असून 1 लाख 11 हजार 692 अर्ज तपासणीमध्ये आहेत.95 अर्ज नामंजूर झाले असून 3564 अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात आले आहेत. अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी लाभार्थी महिलांना मोबाईवर संदेश पाठविण्यात येत आहे. त्रुटीचा संदेश प्राप्त होताच संबंधीत महिलांनी आवश्यक त्रुटीची पुर्तता करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही संधी एकवेळेसाठीच मिळणार असल्याने त्रुटीची पुर्तता काळजीपुर्वक करावी.


ज्या इच्छुक पात्र लाभार्थीनी अद्याप अर्ज भरले नसल्यास त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup या संकेतस्थळावर क्रियेट अकांउंट वर क्लीक करून आपले अर्ज भरावेत. ज्यांना स्वत: अर्ज भरणे जमणार नाही त्यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षीका, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, नगरपालिका/नगरपंचायतीचे मदत केंद्र, अशा वर्कर, बचत गटाचे समुहसाधन व्यक्ती या शासनाच्या अधिकृत प्रतिनिधींकडून /केंद्रावरून अर्ज भरून घ्यावे. 


ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत या ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रीया लाभार्थ्यांसाठी मोफत असल्याने त्यासाठी कोणालाही पैसे देवू नये असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !