बदलापूर,अकोला जिल्ह्यातील घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध ; ब्रम्हपुरी महाविकास आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,२४/०८/२४ पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस महीला अत्याचाराचे प्रकरण व अल्पवयीन मुलामुलींच्या लैंगिक शोषनाच्या घटना वाढत आहेत. यामुळे सामाजिक आरोग्य व सुरक्षा धोक्यात आली आहे.सदरची बाब महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनिय व चिंतेची असुन हि राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे महीला व मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कडक कायदे करून महाराष्ट्रातील महीला सुरक्षेची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी.
बदलापूर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीची संपत्ती जप्त करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. सोबतच महीला सुरक्षेच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या महायुती सरकारच्या विरोधात काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष वासु सोंदरकर, शिवसेना(उबाठा) उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, जिल्हा काॅंग्रेसचे सचिव विलास विखार, कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले,
महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे, निनाद गडे, अॅड आशिष गोंडाणे, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष प्रशांत बगमारे, संघटक अतुल राऊत, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सोहेल सय्यद, कृउबा उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका वनीता अलगदेवे, माजी नगरसेविका निलीमा सावरकर
महीला काँग्रेसच्या उपाध्यक्ष कल्पना गेडाम, महीला काँग्रेसच्या सचिव सुशिला सोंडवले, प्रा.डि.के.मेश्राम, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम कावळे, सोशल मीडिया प्रमुख रश्मी पगाडे, सुभाष सहारे, संदीप बगमारे, हिमांशू नंदुरकर, इकबाल जेसानी, भास्कर सोनोने, तुळशिराम काटलाम, राममोहन ब्राडीया, गीता मेश्राम, शालू राऊत यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.