मा.भुजंगभाऊ ढोले व भूमिपुत्र ब्रिगेडचे अविरत साखळी उपोषण.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
पोंभुर्णा : पोंभुर्णा येथील मध्यस्तानी असलेल्या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव देण्यात यावे ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. याबद्दल कित्येकदा निवेदन देऊन सुद्धा पॉम्भुर्णा येथील प्रशासनाने यावर अंमलबजावणी केली नाही.
शेवटी मा. भुजंग भाऊ ढोले यांनी दिनांक 16 तारखेपासून उपोषण सुरू केले आणि याबाबत माहिती मिळताच तात्काळ भूमिपुत्र ब्रिगेड पोंभूर्नां यांनी भुजंग भाऊ ढोले यांच्यासोबतच साखळी उपोषण सुरू केले.
भुजंग भाऊ ढोले यांच्या उपोषणा सोबतच पहिल्या दिवशी भूमिपुत्र ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष मा.श्रीकांत दादा शेंडे,दुसऱ्या दिवशी मा. दयानंद गुरनुले,गौरव ठाकरे तर तिसऱ्या दिवशी मा. रामदास ठाकरे व सचिन आदे यांनी साखळी उपोषणासाठी शर्तीने साथ दिली.
या उपोषणासाठी प्रामुख्याने पहिल्या दिवशी डॉ.अभिलाशा ताई गावतुरे , भूमिपुत्र ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष डॉ.समीर कदम यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याचे मनोधर्या वाढविले,त्यानंतर अखिल भारतीय माळी महासंघाचे डॉ.सचिन भेदे, सोबतच ऍड प्रशांत सोनुले आणि मंडळी ,त्यानंतर डॉ.राकेश गावतूरे आणि नंतर भूमिपुत्र ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष मा.विजय मुसळे यांनी या मागणीला पूर्ण ताकदी निशी पाठिंबा दिला आणि सायंकाळी प्रशासनाने आम्ही आपली मागनी मान्य करून असे आश्वासन दिले.