चामोर्शी रोड सेमाना टर्निग पाइंड वर झालेल्या तिघांच्या अपघातांची गडचिरोली पोलीसा कडून ना चौकशी ना गुन्हा दाखल.

चामोर्शी रोड सेमाना टर्निग पाइंड वर झालेल्या तिघांच्या अपघातांची गडचिरोली पोलीसा कडून ना चौकशी ना गुन्हा दाखल. 


 मुनिश्वर बोरकर - गडचिरोली 


गडचिरोली : मार्नीग वॉकला दररोज जाणारे वंचित चे जिल्हाध्यक्ष,बाळू टेभुर्णे ' सरपंच राजु उंदिरवाडे  वसंत मेश्राम शिक्षक सर्व गोकुळनगर हे नेहमी प्रमाणे सेमाना चामोर्शी रोड मार्निंग वॉक ला पहाटे ५ चे दरम्यान जात असताना गडचिरोली वरून चामोर्शी मार्ग जाणारी आय 20 गाडी नंबर MH 33 -V 0090 च्या ड्रायव्हर ने त्या तिघांना सेमाना टर्निग जवळ मागून ठोकले ते तिघेही सायकल ने जात होते. 

त्यामुळे त्यांच्या सायकली व ते बाजुला फेकल्या गेलेत. आय 20 गाडीची नंबर प्लेट सुद्धा तुटून कचऱ्यात पडली होती. अपघात वाल्यांना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले . त्यांनी पोलीस स्टेशन मधे रिपोर्ट दर्ज केला.बाळू टेभुर्णे याना टाके पडले हाताला मार लागला. तर वसंत मेश्राम हे गंभीर जखमी झालेत त्यांना नागपूर दवाखान्यात हलविण्यात आले. 


सरपंच उंदिरवाडे हे किरकोड जखमी झालेत.तरीही आजतागायत गाडी ड्रायव्हर यांचेवर गुन्हा दाखल झालेला नाही.अपघात करून पडून जाणे हिट ऍड रॅन नुसार १२५ अ व १२५ ब या कलमाखाली गुन्हा दाखल करायला पाहीजे परंतु गडचिरोली पोलीसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे पोलीसाकडे संशयाच्या भुमीका म्हणुन मार्निन वॉक वाले पाहत आहेत. 


यातिल गोम अशी की दिलीप मंडल चामोर्शी यांनी i 20 गाडी पोलीस कंमाडर सुरज ठाकरे यांना चार वर्षापूर्वीच विकली परंतु कागदोपत्री गाडी कुणाची हा संशयाचा विषय आहे. गाडी चालवणारा गेडाम ड्रायव्हर होता . कमांडर वाल्याची गाडी असल्यामुळे पोलीसही गुन्हा दाखल करीत नसुन कमांडरला वाचविण्याचा काटोकाट प्रयत्न गडचिरोली पोलीसा कडून होत आहे. 


महत्वाची बाब अशी की एका राजकीय पक्षाचा वंचितांचा जिल्हाध्यक्ष सरपंच व शिक्षक प्रतिष्ठीत व्यक्ती .यांचा अपघात होवूनही गुन्हा दाखल न होने याचे नवल वाटतो पोलीस आमच्या मरणाची वाट पाहत होते काय असे अपघात वाल्यांचे म्हणणे आहे.तर एवढ्या मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा अपघात होवूनही गुन्हा दाखल झाला नाही तर सर्वसामान्य व्यक्तीची रिपोर्ट पोलीस फेकुनच दिले असते असे धास्तावले मार्निंग वॉक वाल्याचे म्हणणे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !