झेंडा वंदन करून शेतात पेंढ्या टाकायला गेला आणि पाय घसरल्याने विहीरीत पडून मृत्यु झाला.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
एटापल्ली : १० वित शिकत असलेला डुम्मे गावातील मुलगा सकाळी शाळेत झेंडावंदन केले व ११ वाजता घरचे रोवणे सुरु आहे म्हणुन रोवण्याच्या पेंढ्या टाकायला शेतात गेला दुपारच्या जेवणासाठी विहीरीजवळ ठेवलेल्या जेवणाच्या डंब्याकडे गेला हात पाय धुवायला विहीरीजवळ गेला तोच तोल जावून विहीरीत पडला.
तो विहीरीतच तरंगत. दि. १५ ऑगष्ट २०२४ एटापल्ली तालु्यातील ७ कि .मी अंतरावरील डुमे गावातील निखिल सदाशिव दुर्वा वय १७ हा शाळेच्या झेडांवदंन करून शेतात रोवण्याच्या पेंढ्या पसविण्याकरीता शेतात गेला.
शेतात काम करून झाल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी विहीरीजवळ ठेवलेल्या डब्याकडे गेला. हातपाय धुतो म्हणुन विहीरीजवळ गेला असता बिना तोडीच्या विहीरीने निखिलचा घात केला त्यांचा पाय घसरून तो विहीरीत पडला. पोहता येत नसल्यामुळे व जवळ कुणीच नसल्यामुळे त्याचे प्रेत चक्क तरंगतांनाच आईला दिसते.
तिने एकच हंबरडा फोडला परंतु व्यर्थ अखेर एटापल्ली पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी मर्म दर्ज करून शव उत्तर तपासणी साठी ग्रामीण रुग्नालय एटापल्ली नेण्यात येऊन अधिक तपास सुरु आहे. निखिल च्या अकस्मित मृत्युमुळे सारा गाव हळहळला.