सावली केंद्रातील शाळेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेतर्फे नोटबूक वितरण.
★ खाजगी व जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांचा समावेश.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
सावली : तालुक्यातील सावली केंद्रातील सावली,रुद्रापूर,कवठी,पारडी,सिंगापूर,चांदली बुज,खेडी या गावातील विदयार्थ्यांना आज नोटबूक वितरण करण्यात आले.जनसेवा हिच ईश्वर माणून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची ओळख आहे,त्यांचा विजयकिरण फाउंडेशन तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जातात.
त्यापैकी एक म्हणजे नोटबूक वितरण,आज सावली तालुक्यातील सावली केंद्रातील सर्व खाजगी तथा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना माजी पंचायत समिती सभापती, मा.विजय कोरेवार,सावली शहर अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार यांच्या मुख्य उपस्थितीत नोटबूकचे वितरण करण्यात आले.
नोटबूक वितरण करताना नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,युवा शहराध्यक्ष मा.अमरदीप कोणपतीवार,सभापती मा.प्रितम गेडाम,सौ.सीमा संतोषवार,सौ.प्रियंका रामटेके,नगरसेवक मा.सचिन संगीडवार,मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सुरामवार,नगरसेविका सौ.ज्योती गेडाम,सौ.अंजली देवगडे,सौ.पल्लवी ताटकोंडवार,
माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार,ग्राम काँग्रेस कमिटी रुद्रापूरचे अध्यक्ष मा.खुशाल राऊत,शेतकरी राईस मिल सावलीचे अध्यक्ष मा.मोहन गाडेवार, मा.अतुल येल्लटीवार,मा.रवी गेडेकर,ग्रामपंचायत सदस्या सौ.शुभांगी संतोषवार,मा.विलास येंगटीवार,सौ.शिलाताई गुरुनुले,मा.आकाश खोब्रागडे,मा.निखिल दुधे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम तसेच आदी उपस्थित होते.
सावली केंद्रातील माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करून सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार, विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मुलांच्या प्रतिभेला उपक्रम,कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून व्यासपीठ मिळवून दिले आहे. यापुढेही हे काम अविरतपणे सुरूच राहील. - विजय कोरेवार,माजी सभापती पंचायत समिती,सावली