रांगी परिसरात अनेक ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांची चोरी ; धानोरा पोलीसांचे दुर्लक्ष.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
धानोरा : रांगी परिसरात अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहेत.सध्या रोवण्याचा चिखल करण्याचे काम हंगाम जोरात सुरू असुन ट्रॅक्टरच्या बॉटऱ्या चोरणाराचे प्रमाण वाढले आहे.सदर परिसरतील शेतकऱ्यांच्या 4 ते 5 ट्राक्टरच्या बॉटऱ्या चोरीला गेलेल्या आहेत.काही कास्तकारांनी धानोरा पोलीस स्टेशनला रिपोर्ट दर्ज केलेला आहे. परंतु सदर प्रकरणाची चौकशी अजुनही धानोरा पोलीसाकडून होतांना दिसत नाही.
दि,9 ऑगष्ट च्या रात्रौ घरासमोर ठेवलेल्या ट्रॅक्टरचे मालक जनार्धन बांबोळे रांगी यांची ट्राक्टरची बॉटरी चोरट्यांनी लंपास केली तर याच रात्रौ भाकरोडी च्या कास्तकाराची ट्रॅक्टरची बॉटरी चोरीला गेली तर 4 दिवसापूर्वी सुधाकर कन्नाके,महावाडा व तोडासे भाकरोडी.रांगी परिसरातील 4 ते 5 शेतकऱ्यांच्या ट्राक्टरची बॉटऱ्या चोरीला गेले.
सदर घटना रात्रौ च्या वेळेस होत आहेत तरी धानोरा पोलीसांनी चोरांचा शोध घेऊन त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी केलेली आहे.