धानोरा रोड गडचिरोली वातानुकूल सिनेमागृह ची निर्मिती होत आहे ; नगर प्रशासनाचा पुढाकार.

धानोरा रोड गडचिरोली वातानुकूल सिनेमागृह ची निर्मिती होत आहे ; नगर प्रशासनाचा पुढाकार.


गडचिरोली -  मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील स्वराज्य हेल्थ क्लब च्या बाजूला लाखो रुपये खर्चून तयार होत असलेल्या हवा भरलेल्या वातानुकूलित सिनेमागृह साकार होत असुन सिनेमा गृहाचा शुभारंभाचा मुहूर्त लवकरच होणार असुन वातानुकुल सिनेमा गृह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासाठी मुर्हताची वाट पाहावी लागणार आहे.

गडचिरोली शहरात एकमेव भव्य अशा वातानुकूलित सिनेमागृहामध्ये दर्शकांची संख्या जवळपास १२० दर्शकांसाठी आशनाची व्यवस्था असणार आहे. सिनेमागृहाच्या बाजूला भव्य चारचाकी व दुचाकी वाहनासाठी पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे.



गडचिरोली शहरात पूर्वीपासूनच दोन सिनेमागृह आहेत पण दर्शकाच्या नाराजीमुळे त्या सिनेमागृहाकडे दर्शकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच नगरपरिषद प्रशासन सुरू करत असलेल्या सिनेमागृहात लोक किती पसंती देतात हे पाहण्यासारखे आहे गडचिरोली ची जनता वातानुकूलित अशा भव्य सिनेमागृहात सिनेमा पाहण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.


नगर परिषदेच्या जागेवर भव्य असा वातानुकूलित सिनेमागृह साकारला आहे त्या सिनेमागृहाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे पण सिनेमगृहाच्या मागील बाजूला असलेल्या संरक्षक भिंत अति पावसामुळे खचल्याने त्या संरक्षण भिंतीचे पुनर्बांधणीचे काम पुन्हा केले जात असून लवकरच थिएटर सुरू होत असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !