सुरजागड लोह खनिज कंपनी च्या विरोधात ट्रान्सपोर्ट (ट्रक) वाले आंदोलन फुकारणार ; स्थानिक वाहतुकदारांना डावलले.खनिज साईड मंत्र्याच्या व विरोधी पक्षाच्या प्रमुखाकडे.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.लि.कंपनी तर्फे शासन ठरविलेल्या दरानुसार कार्यारंभ आदेश न दिल्यास लोह खनीजाचे वाहतुक पुर्ण पणे बंद करण्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याची माहिती आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोशिएशन जिल्हा गडचिरोली ने दिला.
असुन संघटनेचे पदाधिकारी पोर्टल / युट्युब प्रेस च्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली. लोहखनीज उत्खननाचे काम त्रिवेणी कंपनी च्या आदेशनुसार ट्रान्सपोर्टीग त्रिवेदी करतो.दर टनामागे 300 रुपये कमिशन देतात.
आपल्या मर्जीने ट्रकला आर्डर देतात.work order नेहमीच बदलवितात. बेरोजगारांच्या ट्रकला काम नाही.बेरोजगारांना काम घ्या अशी विनंती कंपणी व्यवस्थापक एम.डी.प्रभाकरण यांना वारंवार करूनही ट्रान्सपोर्ट वाल्यांना काम नाही.
त्यामुळे करोडो च्या ट्रका घेऊनही आम्ही बरोजगार झाले आहोत.आपले संसार उघड्यावर पडत आहे. आज उपासमारीची पाळी आमच्यावर आली आहे.मात्र राजकीय पुढाऱ्याच्या ट्रकांना काम दिल्या जातो.
एवढेच नव्हे तर केळझर लोह खनीज सॉईड भाजपाच्या मंत्र्याच्या माणसाकडे , बल्लारसा साईड विरोधी पक्षाच्या प्रमुखाच्या माणसाकडे ठेके देऊन राजरोसपणे त्यांच्या करवी काम केले जाते मात्र ट्रक चालक मालक बेरोजगारांना डावलल्या जाते अशीही माहिती ट्रान्सपोर्ट असोशिएशन जिल्हा अध्यक्ष,निकेश गद्देवार सचिव,निच्पिल मंडल यांनी पत्रकारांना दिली.
अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्हाईस ऑफ मिडिआ च्या सैनिकी स्कुल मधे झालेल्या कार्यक्रमात म्हणाले होते.की सुरजागड प्रकल्पाच्या कामात स्थानिक बेरोजगारांना काम देऊ तेही प्रथम विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नंतर राष्ट्रवादी च्या कार्यकर्तयांना आता मात्र स्थानिक ट्रक स्टार्सपोर्ट वालेच बेराजगार होत आहेत.
आम्ही स्वतःचे घर - जमीनी विकुन ट्रका खरेदी करून सुरजागड कंपनीकडे कामावर लागलो. परंतु कंपणी आता दररोज नियम बदलवून आम्हाला डावालण्याचा घाट घालत आहे. उलट ओडीसा - बिहार परप्रांतीयांना कामवर घेऊन काम दिल्या जातो.
आम्हाला न्याय न दिल्यास आम्ही आमच्यावर नेहमीच होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही जिल्हा वाहतुकदार दि. १६ ऑगष्ट पासुन लोकशाहीच्या मार्गाने लोह खनीजाची वाहतुक बंद पाडू अशा ईशाराही स्ट्रासपोर्ट अशोशिएशन संघटनेने दिलेला आहे.
पत्रकार परिषदेला निखिल मंडल,आशिष मेडीवार ,गणेश दासलवार,मलरेड्डी येमनूरवार,जमीर शेख , संदिप गुडपवार,किशोर राप्पेल्लीवार,बहुसंख्य वाहतुकदार उपस्थित होते.