गाय वाटप घोटाळ्यात दोषी असलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांना निलंबित करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा. - प्रणय खुणे राष्ट्रीय मानवाधिकार ( एसो ) प्रदेशाध्यक्ष मागणी.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : गाय वाटप घोटाळ्यात दोषी असलेले तत्कालिन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता IAS यांना निलबिंत करून अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी राष्ट्रीय मानवधिकार संघटण (असो.) नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,प्रणय खुणे व नगरसेवक मनोहर बोरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
आदिवासी बहुल भागातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करतो परंतु काही भष्ट्र अधिकाऱ्यामुळे सदर उद्देश सफल होत नाही अशाच प्रकार राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी सन २०२१ ते २०२३ मधे गाय वाटप योजने अंतर्गत लाखो रुपयाचा गैरव्यवहार केला.
अप्पर आयुक्त यांच्या चौकशीत गुप्ता दोषी आढळले. आदिवासी समाजातील लाभार्थी व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून धमकावणे शेकडो कोटीचा भ्रष्टाचार करणे एटापल्ली येथे कार्यरत असतांना कत्राटदारांना धमकावणे भामरागड येथील आदिवासी महिला भारती इष्टाम या आदिवासी महिलेचा छळ करणे आपल्या पदाला दुरउपयोग करून अनेकांवर गुन्हे दाखल करणे आदि कारनामे करणाऱ्या शुभम गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करून अट्रोसिटी अतंर्गत गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी प्रणय खुणे , नगरसेवक मनोहर बोरकर, महिला भारती इष्टम , यशोदा देऊ पुंगाटी , शंकर ढोलगे , विनोद चव्हाण आदिंनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती सांगून मुख्यमंत्री , उपमुखमंत्री व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
यापुढेही प्रणय खुणे यांनी सांगीतले की इंग्रजानी हुकुमशाही प्रमाणे राज्य केले त्याचप्रमाणे गुप्ता हे आदिवासी सोबत वागले आहेत. अनेकांवर खोट्या गुन्हात अडकवून जेल मध्ये पाठविण्याचे काम करणारे परंतु गाय वाटप प्रकरणात स्वतः दोषी ठरणारे गुप्ता यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही खुणे यांनी केली.