एम.आय.एम च्या पंतग चिन्हावर गडचिरोली विधानसभेची जागा रुपाली आत्राम निवडणुक लढण्यास इच्छुक.
★ एम.आय.एम.चे बाशिद शेख यांची उमेदवार चाचपणी सुरु.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : MIM गडचिरोली जिल्हयातील तिनही विधानसभा क्षेत्रात आपले उमेदवार उभे करणार आहेत. यासाठी गडचिरोली जिल्हयातील MIM चे जिल्हाध्यक्ष बाशिद शेख , ॲड मन्सुरी हे आता पासूनच उमेदवाराची चाचपणी सुरु केली.
असुन MIM तिसरी आघाडी तयार करणे सुरु असून किंवा MIM स्वतंत्रपणे निवडणुक लढविणार आहे.अश्या परिस्थितीत गडचिरोली विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणुन आदिवासी समाजातील धडाडीच्या नेत्या सौ. रुपाली आत्राम हिने MIM च्या तिकीटावर पतंग या चिन्हावर तिकीट मागण्यास इच्छुक आहेत.
रुपालीताई आत्राम ह्या गडचिरोली शहरातील प्रतिष्ठीत शेमनशहा आत्राम यांची मुलगी असुन त्या MIDC गडचिरोली येथे राहतात त्या डि.एड असुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करतात.त्या खासदार असदुद्दीन ओवैसी व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला प्रेरित होवून त्या mim कडे तिकीट मागण्यास इच्छुक आहेत.
रुपालीने AIMIM नेते बाशिद शेख ' जिल्हा सचिव ॲड. सिद्दिक मन्सुरी , युवा नेते दिलीप बाबोंळे , रमजान शेख ' जावेद शेख , किशोर जाधव , तेजराम नेतनकर , केदारनाथ गेडाम , मुन्ना रामटेके , दिपक झोडगे आदि पदाधिकाऱ्याकडे इच्छा दर्शविली.