संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया. - डॉ.जगदिश मेश्राम : प्रगती अहवाल कार्यक्रम
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०३/०८/२४ " भाषा साहित्य संशोधन हे सूक्ष्म व अनेक पातळ्यांवरचे असते.विषय समजून घेऊन त्याचे नेमके संदर्भ विवेचनासह ते सादर करायचे असते.कोणती संशोधन पध्दत संशोधकाला सोयीची आहे,हे मार्गदर्शक व विद्यार्थ्यांने ठरवून प्रबंध पूर्ण करावा लागतो,तरी यापुढे जाऊनही त्या विषयाचे संशोधन पुढे सुरु ठेवता येते.
कारण संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे" असे बहुमोल मार्गदर्शन डॉ जगदिश मेश्रामांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित संशोधक विद्यार्थ्यांचा सहामाही प्रगती अहवाल कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
विचारपिठावर मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे उपस्थित होते. डॉ खानोरकरांनी ही,संशोधन करतांना येणा-या अडचणी व त्यावरील उपाय सांगीतले. यानंतर आपल्या विषयावर वीस विद्यार्थ्यांनी सचित्र प्रगती अहवाल सादर केला.कार्यक्रम प्राचार्य डॉ डी एच गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
संचालन डॉ वानखडे तर आभार डॉ वट्टीनी मानले.यशस्वीतेसाठी पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.