जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगांव येथे लाकडी नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी -३१/०८/२४ सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेला कृतिशील सौंदर्याने नटवून ठेवण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्याने जिल्हा परिषद मुख्याध्यापक,देवानंद तुर्काने हे सतत कार्यशील असतात.
येणारा बैलपोळा व तान्हा पोळा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी लाकडी नंदीबैल सजावट आणि विद्यार्थ्यांची वेशभूषा सजावट स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत
१) अजय भानू कुमार राठोड
प्रथम क्रमांक
२) क्रिश पुरुषोत्तम राऊत
दुसरा क्रमांक
३) थान्वीक मिलिंद राऊत
तिसरा क्रमांक यांनी पटकविला सदर विजेत्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण मिसार, मुख्याध्यापक देवानंद तुर्काने,ज्येष्ठ शिक्षक खरकाटे,पालक सदस्य संजय जराते गावातील प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थ्यांचे आई- वडील बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक तुर्काने तर आभार पातोडे सर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.