संतोषसिंह रावत यांची भुजंग ढोले यांच्या उपोषण मंडपाला भेट.
★ सावित्री बाई फुले चौक बाबत न.प.प्रशासक शिवाजी कदम यांचेशी केली चर्चा.
राजेंद्र वाढई !! उपसंपादक !!
पोंभूर्णा : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा नगरात असलेल्या मुख्य चौकाला क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांचे नाव देण्यास प्रशासन दिरंगाई करीत असल्याने माळी समाजाचे अध्यक्ष,भुजंग ढोले यांनी १६ आगष्ट २४ पासून आमरण उपोषणाला बसले आहे.यापूर्वीच त्याच जागेवर सावित्री बाई फुले चौकाचा बोर्ड लावण्यात आलेला आहे.
असे समाज बांधव व ग्रामस्थांसह अनेक नागरिकांनी श्री.रावत यांचे जवळ बोलून दाखविले. याबाबत प्रशासक तहसीलदार श्री. कदम यांचेशी संतिषसिंह रावत यांनी फोन वर चर्चा केली असता लवकरच तोडगा काढतो असे सांगितले.तरीदेखील आपण समाज बांधव मां.जिल्हाधिकारी यांनीही निवेदन द्यावे असा सल्ला दिला.
काँग्रेसनेते सी.डी.सी.सीबँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष,मुल.न.प.चे माजी नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, श्री.संतोषशिंह रावत यांचेसह यावेळी मुल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, कृषी बाजार समितीव सचालक,हसन वाढई, ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडू गुरनुले,ओबीसी सेल अध्यक्ष,राजेंद्र वाढई उपस्थित होते.
यावेळी ओमेश्र्वर पदमगिरवार अशोक गेडाम, धम्मा निंमगडे,पराग मुलकलवार,नंदू बुरांडे,गणेश वासलवार,आनंदराव पातले, सद्गुरू धोले, सुनील कूंदोजवार,हिंमगिरीबैस, अशोक सिडाम, व अनेक पोंभुरणा वासी उपस्थित होते.