जन शिक्षण संस्थान,गडचिरोली च्या माध्यमातून शिवणकला प्रशिक्षण केंद्र,ठानेगाव येथे हर घर तिरंगा जनजागृती कार्यक्रम.
★ श्री.केशव चव्हाण,कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान,गडचिरोली यांचे मार्गदर्शन.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
आरमोरी : कौशल्य विकास उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने जन सामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना,स्वच्छता जनजागृती माहिती, विविध स्वच्छता अभियान,आरोग्य विषयक जनजागृती व हर घर तिरंगा संकल्पना स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जन शिक्षण संस्थान,गडचिरोली यांच्या वतीने जन शिक्षण संस्थान,गडचिरोली च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सहाय्यक शिवणकला प्रशिक्षण केंद्र,ठानेगाव तालुका आरामोरी जिल्हा गडचिरोली यांनी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ठानेगाव या ठिकाणी हर घर तिरंगा जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.केशव चव्हाण कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान, गडचिरोली,श्रीमती सुचिता सुधाकर ठाकरे प्रशिक्षिका पी.एम.विश्वकर्मा,अंकिता ठाकरे JSS प्रशिक्षिका, ठानेगाव,कु.मंदा दिगंबर राऊत मुख्याध्यापिका, जि.प.शाळा ठानेगाव, श्री. सचिन अभिमन्यू मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दि 14 ऑगस्ट 2024 रोजी शिवनकला प्रशिक्षण केंद्र ठानेगाव येथे कार्यक्रम अधिकारी केशव चव्हाण यांनी प्रशिक्षणार्थीना देश सेवेचे महत्त्व सांगितले व मार्गदर्शन केले.
देशभक्तीपर जनजागृती रॅली घेतली.हर घर तिरंगा संकल्पना राबवीत असताना शिवणकला प्रशिक्षण केंद्र, ठानेगाव या ठिकाणी उपक्रमा प्रसंगी जन शिक्षण संस्थान गडचिरोली मा. केशव चव्हाण,कु.मंदा दिगंबर राऊत मुख्याध्यापिका, जि.प.शाळा ठानेगाव, श्री.सचिन अभिमन्यू मेश्राम व शिवनकला प्रशिक्षणार्थी हे सर्व "हर घर तिरंगा" जनजागृती कार्यक्रम राबवित असतांना उपस्थित होते.