गडचिरोली जिल्हा काँगेसचे धरणे व चक्का जाम आंदोलन.
★ जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती सह इतर मागण्यांचा समावेश ; मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना असह्य त्रास होत असून अनेक निःशपाप नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाह इतर प्रमुख मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात, खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आम.आनंदराव गेडाम,माजी जि. प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी,काँग्रेस जेष्ठ नेते हसनअली गिलानी,शंकरराव सालोटकर,शहर अध्यक्ष,सतीश विधाते,माजी जि.प.उपाध्यक्ष तथा जिवन नाट,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, विश्वजीत कोवासे,अतुल मल्लेलवार,वामनराव सावसाकडे,रामदास मसराम,केसरी पा.उसेंडी, तालुकाध्यक्ष,मिलिंद खोब्रागडे,वसंत राऊत, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले,
प्रमोद भगत, प्रशांत कोराम,नेताजी गावतुरे, अनिल कोठारे,रजनीकांत मोटघरे,हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, छगन शेडमाके,संजय चंने, रुपेश टिकले, घनश्याम वाढई,तेजस मडावी, कुसुम आलाम,डॉ.सोनल कोवे,पुष्पलता कुमरे, उषा धुर्वे,मंगला कोवे,अपर्णा खेवले,भारत येरमे, अब्दुल पंजवाणी,सुभाष धाईत,उत्तम ठाकरे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :-
1) जिल्ह्यातील गडचिरोली - आरमोरी, आष्टी-अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग आणि चामोर्शी - मूल राज्यमार्ग सह जिल्ह्यातील इतरही रस्त्याच्या दुरूस्ती संदर्भात वारंवार मागणी करून देखील अद्याप रस्त्याची दुरूस्ती झाली नाही, तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
2) सुरजगाड येथून चालणाऱ्या जड वाहतुकीने रस्त्याची पूर्ण चाळन झाली असून अपघाताचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत चालले आहे त्यावर प्रभावी उपाय योजना करण्यात यावी.
3) गडचिरोली अतिदुर्गम व मागास जिल्हा असून सुद्धा रस्ते विकासाकरीता राज्य सरकारने इतर जिल्ह्याच्या तुलनेत फक्त 10% निधी दिला आहे, त्यामुळे अनेक कंत्राटदारांनी कामबंद आंदोलनाचा ईशारा दिला असून त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होणार आहे. करीता रस्ते विकासासाठी अतिरिक्त निधी वाढवून देण्यात यावे.
4) जिल्ह्यातील अनेक घरकुल धारकांना घरकुलचे पैसे मिळाले नाही. घरकूल धारकांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा करावेत.
5) वारंवार मागणी आणि आंदोलन करून सुद्धा रानटी हत्तीचा अद्याप बंदोबस्त करण्यात शासन अपयशी ठरत आहे त्यावर प्रभावी उपाय योजना करण्यात याव्यात.
6) रेल्वे चे काम चालू झाल्याने त्याच्या माती कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसून तातकाळ नुकसान भरपाई ची रक्कम देण्यात यावी.
7) कोनसरी परीसरातील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला दिल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना विचारात घेऊन, त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा.
8) जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्ण खिळखिळीत झाली त्याची सुधारणा करण्यात यावी.
9) शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला नियमित वीज पुरवठा होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे हातात आलेल्या पीकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना किमान 12 तास नियमित वीजपुरवठा करण्यात यावे.
10) जिल्ह्यात सुरु असलेली लोड शेडींग बंद करण्यात यावी.
11) जिल्ह्यात पुरेशा बसेस ची व्यवस्था नसल्याने नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्याना नाहक त्रास करावा लागत आहे करीता जिल्ह्यात अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात यावे.