एस.सी.एस.टी.आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात भारत बंद.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : एससी. एसटी आरक्षणात वर्गवारी व क्रिमिलिअर निर्णयाच्या विरोधात भारत बंद मधे एस.सी/ एसटी आरक्षण बचाव जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली शहर कडकडीत बंद पाडण्यात आला.
सकाळी ९ वाजता पासुन शहरातील सर्व दुकाने,शाळा महाविद्यालयबंद पाळण्यात आल्यानंतर गांधी चौकात आदिवासी समाजाचे नेते,माधव गावढ यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रा. मुनिश्वर बोरकर,अँड.राम मेश्राम,माजी आमदार डॉ.नामदेव उसेडी,प्रा.भाष्कर मेश्राम,भोजराज कानेकर,विलास कोडाप यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली.
यात ॲड.राम मेश्राम म्हणाले की " आमचा लढा हा राजकीय नसुन सामाजिक आहे.समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे त्यासाठी राजकीय बाजु दुर ठेवून ए.सी.एस.टी.सामाजाच्या लोकांनी एकत्र आले पाहीजे.
माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की मी राजकीय पदासाठी भांडत नसुन मला माझ्या समाजाचे हित लक्षात घेऊन संविधानाचे उल्लंघन होवू नये बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कठीबद्ध आहे असे त्यांनी म्हटले याप्रसंगी माधवराव गावढ यांनी मार्गदर्शनात वर्गवारी करणे हि असैविंधानिक.आहे.जाती जाती मधे भेद निर्माण करून फोडा आणि राज्य करा हि रणनिती आहे.
परंतु हि रणनिती एससी एसटी समाजाने ओळखून जागृत झाले पाहिजे या प्रसंगी विलास कोडाप संदानद ताराम प्रा.भाष्कर मेश्राम गुलाबराव मडावी,रमेश मडावी,हंसराज उंदिरवाडे,तुलाराम राऊत,गौतम मेश्राम,प्रशांत मडावी, मारोती भैसारे,मंदिप गोरडवार,धर्मानंद मेश्राम,ज्ञानेश्वर मुजुमकर,तुळसिराम सहारे,मालती पुडो,मनोहर पोटावी आदिने मनोगत व्यक्त केले.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन,भोजराज कानेकर यांनी तर कार्याक्रमाचे आयोजक प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सर्वाचे आभार मानले.कार्यकमास, कुसमताई आलाम,मिलिंद बाबोळे,सुरेखा बारसागडे,सुधिर वालदे प्रेमदास रामटेके जिवन मेश्राम रोशन उके,अमर खंडारे,सुरेश कन्नमवार,साईनाथ पुगाटी, वनिता पदा,आदि सहीत ग्रामसभा परिसर पोटेगाव बांधवा सहीत बहुसंख कार्यकर्ते आदिवासी व बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.