जातनिहाय जनगणना करा व खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागु करा ; भाकपचे केले धरणे आंदोलन.

जातनिहाय जनगणना करा व खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागु करा ; भाकपचे केले धरणे आंदोलन. 


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : केंद्र सरकार व राज्यसरकारने जातनिहाय जनगणना करावी व खाजगी क्षेत्रात सुद्धा आरक्षण लागू करावे अश्या विविध मागण्यासाठी भारतीय कॅम्युनिष्ठ पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात स्मार्ट प्रिपेड विज मिटरची योजना कायम स्वरूपी बंद करावी. अतिवृष्टी व पुरामुळे पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना एकरी २५००० हजार रुपये नुकसान भरपाई घ्यावी. 



शेतमालाला धान उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव घ्यावा. भंडारा गडचिरोली हायवे करण्यापेक्षा गडचिरोली नागपूर द्रुतगती मार्ग तयार करावा. शेतकरी कामगार बेरोजगार कलाकार आदिंनी ५००० रुपये दरमहा मानधान घ्यावा. सफाई कामगारांना कायस्वरूपी सेवेत कायम करावे. आदि मागण्या साठी भारतीय कॅम्युनिष्ठ पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे धरणे - आंदोलन करून जिल्हाधिकारी दैने साहेब यांना निवेदन देण्यात आले. 


धरणे आंदोलनात भाकपचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.महेश कोपूलवार,जिल्हासचिव,देवराव चवडे,जिल्हा महासचिव ॲङ,जगदिश मेश्राम,संजय वाकडे प्रकाश ठलाल,तुलाराम नेवारे,प्रकाश खोबरागडे,अमोल दामले,ब्रमादास बावणे,राजाराम उईके सहीत बहुसंख्य भाकपाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !