सकल हिंदू समाजाच्या वतीने ब्रह्मपुरी शहरात निघाला हिंदू जनगर्जना मोर्चा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : २४/०८/२४ बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ब्रह्मपुरी तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने काल शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी ब्रह्मपुरी शहरातील शेष नगर येतील नाग मंदिरातून हिंदू जनजागरण मोर्चाला एक वाजता पासून सुरुवात करण्यात आली.
ब्रह्मपुरी शहरातील विविध चौकातुन हिंदू जनजागरण निषेध मोर्चा निघाला. व तहसील कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चा शिवाजी चौकात आल्यानंतरनागपुर विहिंप संयोजक अमोल ठाकरे यांनी ऊद्बबोधन केले. या मोर्चात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर , रा. स्व. संघाचे प्रा. जयंत खराडे, , बाबासाहेब काहारे , विहिपचे राजेंद्र ठाकरे भाजपाचे,प्रा.अरुण शेंडे,अरविंद नंदुरकर,प्रा.रामलाल दोनाडकर,प्रा.संजय लांबे,तनय देशकर, मनसेचे दिपक मेहर,शिवसेनेचे नरु नरड
राकाचे मंगेश फटिंग ,यासह रा. स्व. संघ,राष्ट् सेविका समिती,बजरंग दल,दुर्गावाहिनी ,अभाविप भाजपा कार्यकत्यासह हिंदु समाजबांधव मोठ्या संख्येसह सहभागी झाले होते. याप्रसंगी हिंदू समाजावरा हिंसाचार करणाऱ्या बांगलादेशींचा निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या हिंदू जनजागन मोर्च्यात विविध संघटनेचे पदाधिकारी अनेक पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते.