मारिया महाविद्यालय,मुल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दि.15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आदरणीय संस्था अध्यक्ष जैनुद्दिन जव्हेरी साहेब यांच्या मार्गदर्शनात मारिया महाविद्यालयात, मुल येथे ध्वजारोहण सोहळा,वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.माननीय प्राचार्य डॉ.भास्कर सुस्कारे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध फळझाडे लाऊन वृक्षारोप कार्यक्रम करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे सर तर प्रमुख पाहूणे माननीय बलवंतजी करकाडे, प्रा. कविता शेंडे मॅडम व पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्रा. रामटेके सर हे लाभले होते.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना महाविद्यालय तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषांनातुन शुभेच्छा व्यक्त करतांना जीवनामध्ये यशस्वी व्हायच असेल तर आपले ध्येय समोर ठेवून स्वता आत्मविश्वास बाळगुन कार्यात सातत्य ठेवावे,आयुष्याची ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे असायला हवी त्यामुळे यश मिळवणे सोपे होत जाते अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन मा.करकाळे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपले अनुभव व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तसेच प्रा.शेंडे मॅडम,प्रा. रामटेके सर, प्रा.कामडी मॅडम यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा.निरूडवार सर यांनी केले तर आभार प्रा.मेश्राम सर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व समस्त कर्मचारी वृंद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.