दीक्षाभूमी देसाईगंज येथे वर्षावास निमित्त मुला, मुलींच्या धम्म शिबीराची मालिका.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
देसाईगंज - दीक्षाभूमी देसाईगंज येथे सम्यक जागृत बौद्ध महिला समिती तर्फे संपूर्ण वर्षावासात सात ते सतरा वयोगटातील मुला, मुलींच्या धम्म शिबीराची मालिका दर रविवारी राबविण्यात येणार आहे. दि. ४/८/२४ ला रविवारी या मालिकेतील दुसरे शिबीर पार पडले. पहीले शिबीर २८ जुलै ला पार पडले या शिबीराला मुसळधार पावसामुळे थोडी कमी उपस्थिती होती परंतु दुसऱ्या शिबीराला मुलांनी भरघोस उपस्थिती दर्शविली.
आनापान व पंचशील तत्वाचे पालन कसे करावे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन डॉ. वंदनाताई घोंगडे यांनी केले. सायंकाळी चार वाजता भंते प्रज्ञारत्न यांच्या कडून मुलांनी त्रिशरण, पंचशील घेऊन नंतर सामूहिक वंदना घेण्यात आली. पुर्ण पंचशील व त्याचा अर्थ हिमांशी कराडे हिने सांगितला तिचे विशेष कौतुक करून पारितोषिक देण्यात आले.
शिबीराला उपस्थित सर्वांना शाळेपयोगी वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले शिबीराचे यशस्वी आयोजन करण्याकरिता सम्यक जागृत बौद्ध महिला समिती च्या अध्यक्षा कविता मेश्राम, उपाध्यक्ष श्यामला राऊत, सचिव ममता जांभूळकर व सदस्य यशोदाबाई मेश्राम ,गायत्री वाहने, लीना पाटील, प्रतिभा बडोले व सरीता बारसागडे यांनी परीश्रम घेतले