अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या ई - पॉश मशीनमध्ये तांत्रिक बिघाड सर्व सामान्य नागरिकांनी काय खायचं. - संतोषसिहं रावत

अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या ई - पॉश मशीनमध्ये तांत्रिक बिघाड सर्व सामान्य नागरिकांनी काय खायचं. - संतोषसिहं रावत 

      

राजेंद्र वाढई - उपसंपादक 


मुल : गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरकांना दिलेल्या ई- पॉश मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व सामान्य नागरिकांना देण्यात येणारे धान्य गेल्या आठ दिवसापासून बंद झाले आहेत त्यामुळे आता सर्व सामान्य गरीब नागरिकांनी काय खाऊन जगावं असा प्रश्न चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिहं रावत यांनी प्रशासनाला केला आहे. मूल तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या रोवणीचा  धडाका सुरु असून ग्रामीण शेतमजूर व गरीब दारिद्र्य रेषेखालील मजूर शेतीच्या रोवणीच्या कामात व्यस्त असताना नेमके याच सीजन मध्ये रेशन दुकानातुन अन्न धान्य पुरवठा मिळणे बंद असल्याचे दिसून आले.


त्यामुळे सर्व सामान्य गरीब नागरिकांनी खायचं काय, आणि जगायचं कस असा प्रश्न ग्रामीण नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत ग्रामीण भागातील रेशन विक्रेते दुकानदार यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता काही गावात गेल्या आठ तर 


काही गावात चार पाच दिवसापासून ग्रामीण भागात सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन ई-पॉश मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सर्वसाधारण ग्राहकांना अन्न धान्य पुरवठा वाटप होऊ शकला नाही अशी अडचण निर्माण झाली होती.या बाबत आमच्या प्रतिनिधीने  तालुका प्रशासना कडूनही जाणून घेतले असता ही अडचण संपूर्ण महाराष्टात, जिल्यात जात असल्याचे सांगितले आहे. 


करिता मजूर वर्ग आपल्या कामात व्यस्त असल्याने अशा वेळेस जर ई-पॉश मशीन खराब झाल्याने शासनाने तात्काळ ग्रामीण सर्वसाधारण  गरीब नागरिकांना ऑफलाईन अन्न धान्य वाटप करावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जि. प. अध्यक्ष संतोष सिहं रावत यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !