खेमजई येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा प्रथम वर्धापनदिन व गुणवंत गौरव सोहळा संपन्न.

खेमजई येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा प्रथम वर्धापनदिन व गुणवंत गौरव सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकास ग्रुप खेमजई व ग्राम विकास समिती खेमजई यांच्याद्वारा स्थापित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा प्रथम वर्धापनदिन व गुणवंत गौरव सोहळा २०२४ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा गावच्या सरपंच मनिषाताई चौधरी ह्या होत्या.तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मानवी हक्कांशी निगडित कायद्यांचे पदवीत्तर शिक्षण नार्वे ,स्विडन , स्वित्झर्लंड, इंग्लंड या चार देशात घेत असलेले, जागतिक दर्जाची इरॉसमस मुंडूस स्कॉलरशिप प्राप्त स्कॉलर ॲड .बोधी रामटेके हे होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.राहुल तायडे,धनंजय साळवे,गट विकास अधिकारी चंद्रपूर, डॉ.सतिश अघडते पशु वैद्यकीय अधिकारी,खेमजई 

डॉ.प्रमोद गंपावार,ईश्वर टापरे,सहा.शिक्षक खेमजई, चंद्रहास मोरे, उपसरपंच खेमजई, रमेश चौधरी, ग्राम पंचायत सदस्य, खेमजई , विलास चौधरी सामाजिक कार्यकर्ते खेमजई , ॲड अरविंद पेटकर ,नरेश ताजने कृषी अधिकारी , विश्वनाथ तुराणकर पोलिस पाटील खेमजई, शंकर धोत्रे  अध्यक्ष तं.मु. समिती खेमजई हे होते. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ॲड बोधी रामटेके यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील नामांकित विद्यापीठात असलेल्या संधी व प्रवेश प्रक्रिया यावर मोलाचे मार्गदर्शन केले.


धनंजय साळवे,प्रा.राहुल तायडे,ॲड.अरविंद पेटकर,डॉ प्रमोद गंपावार,नरेश ताजने, विलास चौधरी इत्यादींनी सुद्धा गावच्या विकासासाठी विद्यार्थी-पालक व गावकरी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर २०२३-२४ या वर्षात गावातून जे तरुण शासकीय व खाजगी नौकरी चांगल्या पदावर रुजू झाली त्यांचा तसेच सन २०२४ मध्ये गावातील दहावी- बारावी मध्ये ७०% वरील गुणासह उत्तीर्ण झालेल्या एकुण १९ खेमजई गुणवंतांचा  व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ॲड बोधी रामटेके यांचा सन्मान चिन्ह, भारतीय संविधानाचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


त्यानंतर २०२३ मध्ये पोलिस शिपाई म्हणून निवड झालेल्या करिष्मा श्रिरामे व अभ्यासिकेचा विद्यार्थी आशिष कापटे यांनी स्वताचे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण सौ.मनिषाताई चौधरी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्वाती दोहतरे,प्रास्ताविक लंकेश भेले तर आभार प्रदर्शन श्रिकांत कामटकर यांनी केले. कार्यक्रमाकरीता गावातील मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी साठी रोशन हजारे,शुभम खारकर,प्रज्वल गायकवाड, सुरज पोईनकर, संतोष श्रिरामे ,सूरज कापटे,अनंता चौधरी, अमोल श्रीरामे, ईश्वर हजारे ई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका खेमजई च्या विद्यार्थ्यांनी तसेच विकास ग्रुप खेमजई व ग्राम विकास समिती खेमजई आणि समस्त खेमजईवासियांचे योगदान लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !