चामोर्शी रोड वाकडी फाट्यावर ट्रक च्या धडकेत कुनघाडा ची महिला ठार. ★ मालवाहू ट्रक चालक ट्रक घेऊन फरार.

चामोर्शी रोड वाकडी फाट्यावर ट्रक च्या धडकेत कुनघाडा ची महिला ठार. 


★ मालवाहू ट्रक चालक ट्रक घेऊन फरार.

गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : गडचिरोली वरून अवघ्या 5 कि.मी अंतरावरील वाकडी फाट्याच्या थोड्या समोर ट्रक ने कुनघाडा च्या महिलेला उडवले.ट्रक च्या चाकाने महिलेची भाकरच झाली बघ्याची गर्दी होती.परंतु अपघात महिलेला बघावसे वाटत नव्हते.दि.11 ऑगष्ट 4.00 वा.चे सुमारास कुनघाडा येथील व्यक्ती व एक महिला आपल्या टु व्हिलर गाडीने गावाकडे जात होते. 


इतक्यात चामोर्शी वरुन गडचिरोली जाणारी मालवाहू ट्रकने टु व्हिलर वाल्यांना धडक दिल्यामुळे गाडीच्या मागे बसलेली मय्यत महिला सौ.कुंदाबाई आखाडे वय,60 वर्ष हि ट्रक च्या चक्यातच गेली.त्यामुळे तिच्या शरीराचे भाकरच झाली तर व्यक्तीला सुद्धा जबर दुखापत पोहचली.


मालवाहू ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाले.गडचिरोली ठाण्याच्या पोलीसांना माहिती मिळताच ठाणेदार शिजनजुडे साहेबांच्या मार्गदर्शनखाली अधिक तपास सुरु आहे. कालच सायंकाळी चांदाळा फाट्यावर चांदाळा येथील राकेश किरंगे चा अपघाती मृत्यू झाला होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !