भूमिपुत्र ब्रिगेड बल्लारपूर यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ; बल्लारशाह यांना विविध प्रश्नावर निवेदन देण्यात आले.


भूमिपुत्र ब्रिगेड  बल्लारपूर यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ; बल्लारशाह यांना विविध प्रश्नावर निवेदन देण्यात आले.


सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!


बल्लारपूर : कृषी पंपांना सौर उर्जा ऐवजी पारंपारिक वीज पुरवठा, रब्बी हंगामातील वीज पुरवठ्याच्या समस्यांबाबत तसेच वीज दर कमी करण्याबाबतच्या विषयावर निवेदन देण्यात आले.


कृषी पंपांना पारंपारिक वीज पुरवठा : - 

सध्या कृषी पंपांना सौर उर्जा पुरवठा करण्याचे धोरण लागू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना या सौर उर्जा पुरवठ्यात अडचणी येत आहेत. काही प्रकरणांमध्ये, सौर उर्जा पुरवठा गेल्या एक वर्षापासून बंद आहे व नियुक्त केलेली एजन्सी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, पारंपारिक वीज पुरवठा देण्यात यावा.


रब्बी हंगामासाठी आवश्यक वीज पुरवठा : -


आगामी रब्बी हंगामात ट्रान्सफॉर्मर,लघुदाब व उच्च दाब वाहिनीचे ब्रेकडाऊन व निकामी होण्याचे प्रकार वाढतात . परंतु, स्थानिक एमएसईडीसीएल अधिकारी शेतकऱ्यांना वेळेत प्रतिसाद देत नाहीत. अशा परिस्थिती रोखण्यासाठी कृषी वाहिनींची वेळेत देखभाल करण्यात यावी व ट्रान्सफॉर्मर निकामी प्रकरणात, माननीय MERC च्या SOP नुसार, तत्काळ ट्रान्सफॉर्मर बदलण्यात यावा.


वीज दर कमी करण्याची विनंती : -


महाराष्ट्रातील वीज दर हे तेलंगणा तसेच मुंबईतील BEST, TATA आणि ADANI सारख्या इतर वितरण कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहेत. त्यामुळे, महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील वीज दर कमी करण्यात यावेत अशी विनंती आहे.


प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना : -


या योजनेतून लाभ घेण्यासाठी ग्राहकांना भांडवली बजेटची आवश्यकता आहे. तरी, ज्या ग्राहकांचे मासिक वीज वापर 1 किलोवॅट किंवा 120 युनिट्स आहे.त्यांना मोफत इंस्टॉलेशनची सोय करण्यात यावी कारण हे ग्राहक गरीबीरेषेखालील आहेत.वीजग्राहकांना २०० युनिट विज मोफत द्यावी.


हे निवेदन भूमिपुत्र ब्रिगेड च्या संयोजक डॉ अभिलाषा गावतुरे ,  छायाताई सोनुले, करुणा शेगोकर, ताहिर हुसैन,अनिज खान,सय्यद अझीझ,राहुल गुरनुले , अभिषेक मेश्राम,विनोद निकुरे,अजय टोंगे आदि उपलब्ध होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !