ओ.बी.सीं.ची जात निहाय जनगणना करा. ; एससी एसटीची वर्गवारीता रद्द करा यासाठी भारत बंदचे आव्हान.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : राष्ट्रीय बिछडा वर्ग मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ओबीसींची जात निहाय जनगणना करा व एससी एसटी यांना क्रिमीलेअर न लावणे तसेच वर्गवारीता न करणे यासाठी भारत बंदचे आव्हान करण्यात आले . जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले .हे आंदोलन चार टप्प्यात असून पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात ३० ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तिसरा टप्प्यात १५ ऑक्टोबरला दिल्ली येथे जंतर मंतरवर धरणे प्रदर्शन करण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात ३० ऑक्टोबरला भारत बंद करण्यात येणार आहे हे आंदोलन भारतातील ३२ राज्यात करण्यात येणार आहे .या आंदोलनाचे नेतृत्व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ओबीसी ची जातनिहाय जनगणना करावी व त्यांच्या संख्येनुसार आरक्षणात भागीदारी द्यावे .क्रीमिलेयर हे असंविधानिक आहे. त्यामुळे ओबीसींना लावण्यात आलेली ही अट रद्द करावी .तसेच एससी, एसटी यांना सुद्धा क्रीमिलेयर लावू नये त्यांना जातनिहाय वर्गवारी हे सुद्धा असंविधानिक आहे.
त्यामुळे त्यांची वर्गवारी करण्यात येऊ नये. बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केली परंतु त्याला स्थगिती हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिली आहे त्यामुळे बिहारचे आरक्षण हे अनुसूची नऊ मध्ये टाकावे . खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण लागू करावे तसेच शेतकऱ्यांसाठी एमएसबी कायदा लागू करावे.
तसेच कोल्हापूर मधील शिवागड गाजीपुर येथे मस्जिद तोडफोड अतिक्रमण घटना घडली .या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने आंदोलन करण्याचा ठरवले होते. परंतु पोलीस प्रशासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न केले .त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विरोध करण्यात आला होता. तेव्हा पोलीस प्रशासनाने बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली.त्यामुळे पोलीस प्रशासनातील बाळू जाधव, प्रभाकर देडे ,अजित लकडे व विजय कबाडे यांना निलंबित करावे असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन देते वेळेस डोमा गेडाम बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा प्रभारी , अमरकुमार खंडारे जिल्हाध्यक्ष ,भोजराज काणेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , जनार्दन ताकसांडे जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा,तुळशीराम सहारे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष ,प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी,खेमचंद इंदुरकर जिल्हा चिटणीस, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष,रमेश उईके सचिव,ज्ञानेश्वर मुंजमकर सहाय्यक सचिव,सावन झाडे जिल्हा सचिव ,मनोहर पोटावी जिल्हा उपाध्यक्ष,शंकर आलोने जिल्हा उपाध्यक्ष, किशोर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी, प्रेमदास रामटेके कार्यकारी अध्यक्ष,नरेंद्र शेंडे ,काकासाहेब गडकरी इत्यादी सदस्य उपस्थित होते.