तंटामुक्त समितीचा अध्यक्ष म्हणून होमराज संपत राऊत यांची एकमताने निवड.

तंटामुक्त समितीचा अध्यक्ष म्हणून होमराज संपत राऊत यांची एकमताने निवड.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२३/०८/२४ गावातील तंटे भांडण गावातच सोडवा शक्यतो लहान सहान भांडणासाठी कुणीही पोलीस स्टेशनची पायरी न चढता  आपला वेळ विनाकारण खर्ची घालवू नये म्हणून शासनाने गावागावात तंटामुक्त समितीची स्थापना केली.


याच अनुषंगाने ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथे नियोजित ग्रामसभा दिनांक १७/०८/२४  ला आयोजित केली होती परंतु कोरम अभावी ती सभा तहकूब करून दिनांक,२२/०८/२४ला ग्रामपंचायत भवन येथे घेण्यात आली.या सभेत  अध्यक्ष होमराज संपत राऊत याची एकमताने तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.


सदर निवडीबद्दल अ-हेरनवरगाव ग्रामपंचायत च्या सरपंचा,  सौ.दामिनी चौधरी , सचिव रतिराम चौधरी, मित्रपरिवार यांनी त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले .


तंटामुक्ती अध्यक्ष निवड करतांना अ-हेरनवरगावचे पोलीस पाटील अकुल राऊत,राजु ठेंगरे,राहुल कोल्हे,डाकराम ठेंगरे, प्रशांत दाणी हे उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !