भरदिवसा शेतात वाघाचा वावर शेतकरी भयभीत ; वाघाचा त्वरीत बंदोबस्त करा. - राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.

भरदिवसा शेतात वाघाचा वावर शेतकरी भयभीत ; वाघाचा त्वरीत बंदोबस्त करा. - राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील जिबगांव सीर्सी,साखरी,लोंढोली,हरांबा,कढोली,डोनाळा,रैतवारी चक पेडगांव येथील शेतशिवारात भर दिवसा वाघाचा वावर दिसुन येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशवतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे त्वरीत वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावे अशी मागणी,ग्रा.पं.सदस्य,राकेश गोलेपल्लीवार सह परीसरातील जनता करीत आहेत.

      

सावली तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जंगल शेतशीवाराला लागुन असल्याने वाघाचा नेहमी वावर असतो. सद्या शेतीचे खरीप हंगाम सुरू असुन शेतात कापुस, धानासारखे पिक उभे आहेत.सर्वत्र हिरवेगार रान असुन जंगल सुध्दा हिरवेगार झाले आहे.पण वनप्राण्याचा शेतात व गावाकडे ओढ असल्याचे चित्र परिसरात आहे. त्यामुळे शेतातील पिकांत वन्यप्राणी दिसुन येत आहेत.तर गावाजवळ वन्यप्राण्यांच्या पाऊल खुणा दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामूळे शेतकरी सकाळी सोबत काही लोक सोबत असल्याशिवाय शेतात जात नाहीत.


सद्या शेतकरी सकाळी शेतात नींदन,खते टाकण्याकरीता बैल जोडी घेऊन शेतात जात असतात तर महीला सुद्धा शेतात काम करीत आहेत मागील आठ दिवसांपुर्वी  सिर्सी बीटात शेती शिवारात एका गुराखीला तर दोन दिवस अगोदर डोनाळा येथील शेतकरी गुरे चारत असताना वाघाच्या हल्यात शेतकरी मुत्यु पावले तेव्हा पासुन वाघाचा वावर व लोकांमध्ये भीती दिसून येत आहे.


जिबगांव सीर्सी,चक पेडगांव,सीर्सी चक,डोणाळा, कढोली,हरांबा,साखरी रस्ता या परीसरात शेतशीवारात भर दिवसा वाघाचा वावर दिसुन येत आहे.त्यामुळे परिसरात एकच चर्चा चालू आहे की,इतके वाघ आणि हा नरभक्षी वाघ आला कुठून ? वनविभागाने या वाघाला आपल्या जंगलात सोडले असावे ! अशी चर्चा परिसरात आहे.


यावेळी अनेक शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाले असल्याचे ही बोलले जात आहे. त्यामुळे परीसरातील शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले असल्यामुळे या वाघाचा वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करण्यात यावे. - राकेश गोलेपल्लीवार  ग्रा.पं.सदस्य,जिबगाव

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !