पीपल्स रिपब्लिकन पार्टी ची राज्य कार्यकारणी बैठक नांदेडला १६ ला.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
नांदेड : पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्य कार्यकारणी ची बैठक शासकीय व्हीआयपी विश्रामगृह नांदेड येथे दि . १६ ऑगष्ट २०२४ ला दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे. मुख्य मार्गदर्शक म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे हे असून प्रमुख अतिथी म्हणुन पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,जयदिपभाई कवाडे
पीरीपा प्रभारी महाराष्ट् प्रदेशचे गोपाळराव आटोटे राष्ट्रीय महासचिव ॲड.जे.के नारायणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशभाई उन्हवणे तर प्रमुख अतिथी म्हणुन पीरीपाचे कार्याध्यक्ष चरणदास इंगोले,गणेशराव पडधन हे राहणार आहेत असे कार्यक्रमाचे निमंत्रक बापुराव गजभारे नगरसेवक नांदेड असुन राज्यकार्यकारणी तथा संपूर्ण जिल्हयातील जिल्हाध्यक्षानी उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली पिरिपा जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी कळविले आहे.