सावली तालुक्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत नियमाला डावलून लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप. ★ किसाननगर येथील नागरिकांचा आरोप.

सावली तालुक्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत नियमाला डावलून लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप. 


किसाननगर येथील नागरिकांचा आरोप.


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


सावली : सावली तालुक्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गासाठी 2365 घरकुल मंजुर झाले.ग्रामसभेची बैठक होवून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड होणे आवश्यक होते.

मात्र नियमाला डावलुन घरकुलाचे वाटप करण्यात आल्याचा आरोप किसानगरातील नागरिकांनी केलेला आहे. यासंबंधात विरोधी पक्षनेते,विजयभाऊ वडेट्टिवार यांना निवेदन देऊन यांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे.याप्रकरणी सावली तालुक्याचे बि.डि.ओ यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. 

किसाननगरात बहुतांस नागरिक विमुक्त जाती भटक्या जमातीचे लोक राहतात.1947 सालात पुनर्वसनात अनेक नागरिक किसाननगरात वास्तवाला येवून त्यांनी आपापल्या कच्या झोपड्या बांधुन उदरनिर्वाह करणे सुरु आहे.आम्हाला हक्काचे घरकुल असावे म्हणुन योजने अंतर्गत ग्रामपंचायत व्याहाड (खुर्द) येथे अर्ज सादर केलेले आहेत.


परंतु प्रशासक नियमाला डावलुन घरकुलाचे वाटप करण्यात आले.यात किसाननगरातील गरीब - बेरोजगारावर अन्याय झालेला आहे अशी तक्रारही किसाननगर वासीयांनी केलेले आहे.


निवेदन देताना शिष्टमंडळात रामचंद्र कलीये,धर्मविर मुढाई ,ओमप्रकाश कुडावले,पपिता अशोक ठय्ये,वनती गलगट वाजीरचंद मजोके,रमेश बिके,लक्ष्मीबाई बिके,जयराम मजोके यांचा समावेश होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !