अहेरी विद्यानसभा क्षेत्रांसाठी राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार) गटाचा ताकतवार उमेदवार देऊ. - विजय गोरडवार कार्याध्यक्ष राष्ट्रवादी
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडी ( इंडिआ ) तर्फे अहेरी विधानसभा क्षेत्रांची जागा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे आघाडीत आमच्या पक्षाकडे येण्याची दाट शक्यता आहे.निवडणुकीत आमच्या पक्षाचा ताकदवार उमेदवार देणार असुन त्या दृष्टीने अहेरी विधानसभा क्षेत्रांची मोर्चे बांधणी सुरू आहे.
अश्या प्रकारची माहिती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष विजय गोरडवार गडचिरोली यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची बैठक रेस्ट हाऊस गडचिरोली येथे पार पडली.
यात राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते तालुकाध्यक्ष मनोहर पाटिल भोयर , ॲड . संजय ठाकरे , खेमदेव चापले ,संदिप राऊत , लोकेश लांबाडे , कालीदास बोकडे , रमेश बोबाटे , आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अहेरी विधान सभेची जागा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती व मा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढल्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार आताचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे निवडून आलेत . .आता ते महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कांग्रेस , उपमुख्यमंत्री अजीत पवार गटाकडे आहेत.
परंतु पुर्वीची राष्ट्रवादी कांग्रेसची शक्ती , मतदाता राष्ट्रवादी (शरद पवार ) यांच्या पक्षाकडे आजही कायम आहे. त्यामुळे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आजही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे येवून उमेदवारी मागीतली तरच त्यांना निवडूक येणे सोपी जाईल अन्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे दमदार उमेदवार देऊन निवडून आणण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे.
त्यातही आघाडीत कांग्रेस व शिवसेना पक्ष आघाडी सोबत आहेतच बघुया घोडा मैदान जवळ आहे .राष्ट्रवादी कांग्रेस चे सर्व कार्यकर्ते ताकतीनिसी कामाला लागले असल्याची माहीती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय गोरडवार यांनी सांगीतले.